Ad will apear here
Next
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी
नंदुरबार तालुक्यातील कलमाडी ग्रामस्थांकडून कृतज्ञता
चंद्रकांत सपकाळे यांचा सोन्याची अंगठी देऊन सत्कार करताना कलमाडी ग्रामस्थ.

नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेली ही भेट त्या शिक्षकाने स्वीकारली; मात्र त्या अंगठीच्या किमतीत स्वतःच्या वतीने काही रक्कम घालून ते पैसे गावाच्या आणि शाळेच्या विकासासाठी वापरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत मुरलीधर सपकाळे हे त्या शिक्षकाचे नाव.

मूळचे कानळदा (ता. जि. जळगाव) येथील असलेले सपकाळे नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शहादा तालुक्यातील परिवर्धे केंद्रांतर्गत असलेल्या कलमाडी गावातील शाळेत ते १५ वर्षे कार्यरत होते. शेणामातीचे तळ असणाऱ्या शाळेला त्यांनी आपले सहकारी शिक्षक व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयएसओ मानांकनापर्यंत पोहोचवले. शाळेतील विद्यार्थ्यांचा विकास साधला. आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त शाळेसाठीच न करता त्यांनी गावकऱ्यांसाठीही केला होता. त्यांना या वर्षीचा शासनाचा राज्य पुरस्कार मिळाल्याने कलमाडी गावकऱ्यांनी सपकाळे सरांचा गाव पातळीवर सामूहिक सत्कार केला. त्यांना १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट दिली. शिवाय वैयक्तिक स्वरूपात ८७ जणांनी शाली व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.

गावकऱ्यांमधून प्रत्येकालाच सरांचे कौतुक करायचे असल्याने कार्यक्रम चार तास चालला. सत्काराला उत्तर देताना सरांनी गावकऱ्यांच्या ऋणात राहायला आवडेल, असे सांगितले. ‘गावाच्या सहकार्याने व चांगल्या सहकारी शिक्षकांमुळे मी ही उंची गाठू शकलो. त्यामुळे हा पुरस्कार सर्वांना समर्पित करतो आहे. गावकऱ्यांनी प्रेमाने दिलेली अंगठी मी स्वीकारतोय; मात्र या अंगठीच्या किमतीत अजून वाढीव रक्कम टाकून ती रक्कम कलमाडी शाळा व गावाच्या सामाजिक विकासासाठी माझ्याकडून दिली जाणार आहे,’ असे ते म्हणाले. 

एवढेच नव्हे, तर सत्कार स्वरूपात मिळालेल्या सर्व शाली हिवाळ्यात गरीब ऊसतोड मजुरांना वाटण्यासाठी त्यांनी कलमाडी शाळेच्या कर्मचाऱ्यांकडे दिल्या. कलमाडी गावातील सर्वांनी दिलेले प्रेम व केलेले सहकार्य कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले. 

या नियोजनात सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. ग्रामस्थ संदीप पाटील, मनोज कदम, प्रवीण कलापुरे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व सरपंच यांच्यासह कलमाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चेतन शिंदे , शिक्षक संतोष जगताप, श्रीमती स्नेहल गुगळे या शिक्षकांनी अतिशय छान नियोजन केले. संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या ३००हून अधिक लोकांसाठी अल्पोपहाराची सोय केली. 

कलमाडी ग्रामस्थांनी शिक्षकाचा केलेला हा बहुमान शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकासाठी व महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZMYBT
 Kharch Gavrvaspad Karya Ahe1
 मान उंचवणारे काम कलमाडी गावाने केले1
 अभिनंदन सरांचे💐💐1
 कौतुकास्पद कार्य,,अभिनंदन सपकाळे सर2
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
मंदिरातील धान्य आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला नंदुरबार : मंदिरे ही केवळ धार्मिक श्रद्धास्थाने नसून, ती समाजाची प्रेरणास्थाने आहेत, हा विचार जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न नंदुरबारमधील श्री संकष्टा देवी मंदिर ट्रस्टने वेळोवेळी केला आहे. यंदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून ट्रस्टने अन्नपूर्णा प्रकल्प ट्रस्टने सुरू केला आहे. मंदिरात भाविकांकडून आलेले सर्व
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देण्यासाठी कलसाडी जि. प. शाळेत शिक्षिकेचा पुढाकार नंदुरबार : कलसाडी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी शिक्षिका स्नेहल गुगळे यांनी अनोखा उपक्रम राबविला आहे. त्यांनी सर्व मुला-मुलींना वर्गात कायम वापरता येण्यासाठी एक स्वच्छता किट वर्गात ठेवले आहे. त्यात आरसा, कंगवा, तेल, टिकली, पावडर, नेलकटर या गोष्टी उपलब्ध आहेत
सातपुड्याच्या जंगलात आढळले दुर्मीळ पांढरे मोर नंदुरबार : धडगाव तालुक्यातील (जि. नंदुरबार) डोंगर परिसरात दीड हजारांहून अधिक मोर असून, त्यामध्ये शंभरहून अधिक पांढरे मोर असल्याचे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींकडून सुरू असलेल्या वनसंवर्धनामुळे मोरांची संख्या वाढली आहे. हा भाग सातपुड्यातील पाचव्या व सहाव्या पुड्याच्या आसपास आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language